येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील ममदापूर येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या श्रीराम साबळे या तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोळा सण असल्याने हा तरुण बैल धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेला होता. बैलाने त्याच्या डोक्यावर लाथ मारल्याने बेशुद्ध होऊन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
येवल्यातील ममदापुरात पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू - येवला श्रीराम वामन साबळे न्यूज
पोळा सणानिमित्त श्रीराम वामन साबळे हा तरुण शेतकरी आपल्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यात दोन बैल धुण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी एक बैल त्याने धुवून बाहेर काढला व दुसरा बैल धुण्यासाठी तो बंधाऱ्यात आतमध्ये उतरला असता अचानक बैलाने त्याच्या डोक्यावर लाथ मारल्यामुळे तो बेशुद्ध झाला व पाण्यात बुडाला.
![येवल्यातील ममदापुरात पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू श्रीराम साबळे न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8458788-thumbnail-3x2-yeola.jpg)
पोळा सणानिमित्त श्रीराम वामन साबळे हा तरुण शेतकरी आपल्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यात दोन बैल धुण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी एक बैल त्याने धुवून बाहेर काढला व दुसरा बैल धुण्यासाठी तो बंधाऱ्यात आतमध्ये उतरला असता अचानक बैलाने त्याच्या डोक्यावर लाथ मारल्यामुळे तो बेशुद्ध झाला व पाण्यात बुडाला. दोन्ही बैल बंधाऱ्याच्या कठड्यावरती आले. बैल दिसत होते पण मुलगा दिसत नसल्याने घरातील व गावकऱ्यांनी परिसरात तरुणाची शोधाशोध सुरू केली. मात्र, हा तरुण सापडला नाही. पाण्यात शोध घेतला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.