नाशिक - कोरोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्यावे, मी खूप प्रयत्न केले काळजी घेतली पण यश आले नाही म्हणून, मी आता थेट देवाकडे साकडे घालायला चाललो, अशी चिठ्ठी लिहून 30 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील शहापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये कोरोनाच्या भीतीने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कोरोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्यावे, मी खूप प्रयत्न केले काळजी घेतली पण यश आले नाही म्हणून, मी आता थेट देवाकडे साकडे घालायला चाललो, अशी चिठ्ठी लिहून 30 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील शहापूर येथे घडली आहे.
लक्ष्मण नामदेव बर्डे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या आजीचा आज दशक्रिया विधी होता. कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत जवळील नदीकाठी हा विधी पहाटे सहा वाजता झाला. यावेळी पिंडीला पाणी द्यायला तसेच केस काढायला लक्ष्मण आला नाही भाऊ सुदाम घरी आला असता, अंथरुणात त्याला एका लग्नपत्रिकेच्या पाठीमागील कोऱ्या जागेवर एक मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. आणि भावाने याची माहिती इतर नातेवाइकांना देताच लक्ष्मणचा शोध सुरू केला. खोपडी शिवारात गुरुळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला. आ
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजारा बद्दल भीती व्यक्त केली होती. मी खूप काळजी घेतली पण नाईलाज झाला. माझा घसा दुखणे थांबत नसून. सर्वांनी गरम पाणी प्यावे ही विनंती. देवा सर्वांना सुखी ठेव अशी विनंती करायला मी देवाकडे चाललो आहे असे लिहले आहे. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वर्षभरापूर्वी वडिलांचे तर गेल्या आठवड्यातच आजीचे निधन झाल्यानंतर बर्डे कुटुंबात आज तिसरी घटना घडली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.