नाशिक -नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे 1970 साली भारतातील सर्वप्रथम बाळ येशूचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात ख्रिसमस सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या 'बाळ येशू'च्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. भक्तांकडून बाळ येशूला मोठ्या आस्थेने खेळणी अर्पण केल्या जाते. खेळणी अर्पण केल्याने केलेला नवस पूर्ण होतो आणि दुःखातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे नोकरी, विवाह, संतती आदी समस्यांचा नवस करण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. शिवाय आपल्या समस्या फादर सामोर व्यक्त करून त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील घेत असतात.
नाशिकच्या 'या' ठिकाणी आहे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले बाळ येशूचे मंदिर
नाशिकरोड येथे भारतातील सर्वप्रथम उभारण्यात आलेले येशूचे मंदिर आहे. 1970 साली हे मंदिर उभारण्यात आले. नाताळच्या निमित्ताने याठिकाणी विद्यूत रोषणाई करण्यात आलेली आहे. देशभरातून अनेक भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
बाळ येशूचं मंदिर
नाताळ निमित्त या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात बाळ येशूच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे. येशूच्या जन्मदिनी बाळ येशूची गीत सादर केल्या जातात. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर, आई बबिता कपूर यांनी या मंदिरात येऊन येशूंचे दर्शन घेतले आहे.
Last Updated : Dec 25, 2019, 11:08 AM IST