महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील गुन्हे मागे घ्या, येवल्यातील वारकरी संप्रदायाची मागणी

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध चुकीचा व खोटा खटला दाखल करण्यात आला आहे. महाराजांवर दाखल करण्यात आलेला खटला मागे घेण्यात यावा, अशी मागणी येवला तालुक्यातील सर्व वारकरी व महाराज मंडळी यांनी व इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी या मागणीचे निवेदन येवल्यातील नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे

By

Published : Jul 2, 2020, 3:19 PM IST

नाशिक - जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सर्व वारकरी व महाराज मंडळ यांनी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली. तसेच त्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

'निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरुद्ध चुकीचा व खोटा खटला दाखल करण्यात आला आहे. सर्व वारकरी संप्रदायाच्या विरोधातील दृष्ट लोकांनी खटला दाखल केला असून सदरचा खटला म्हणजे हिंदू धर्मग्रंथावर केलेला एक प्रकारचा हल्ला आहे. निवृत्ती महाराज यांनी ऋषीमुनी, साधूसंत यांची हिंदू धर्मग्रंथ तसेच संहितेमध्ये जे लिहून ठेवले आहे तेच प्रवचन व किर्तनाद्वारे सांगितले आहे. विशेष करून संहिता पुराण कालीन धर्मग्रंथात या सर्व गोष्टी विधिवत केलेल्या आहेत. हिंदू समाजातील चांगल्या चालीरिती परंपरा यांची सवय वर्गाला घालण्यासाठी किंवा त्या मोडीत काढण्यासाठी हिंदूविरोधी तसेच वारकऱ्यांच्या विरोधात असलेल्या तथाकथित बुद्धीजीवी वाल्यांनी सदर खेळ चाललेला दिसत आहे. परंतु, वारकरी संप्रदाय हा मूळ अंधश्रद्धा निर्मुलन करणारा संप्रदाय आहे. निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी या गोष्टी आपल्या किर्तनातून सांगितल्या आहे. त्यांचे वक्तृत्व या विचार धर्मग्रंथात नमूद केले असल्याने आधी अशा धर्मग्रंथ लिहिणाऱ्यांवर खटले दाखल करावेत', अशी मागणी त्यांनी केली आहे. निवृत्ती महाराज इंदोरीकर गेल्या २५ वर्षांपासून किर्तन प्रवचन करत आहेत. परंतु, त्यांच्या कार्यास विरोध म्हणून दुष्ट प्रवृत्तीचे लोक महाराजांवर अशा प्रकारचे बनावट खटले दाखल करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या कायद्याच्या तरतुदीखाली खटला दाखल केलेला आहे, असे कोणतेही वक्तव्य महाराजांनी संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात केलेले नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या गेल्या २५ वर्षातील कीर्तन प्रवचन व इतर आध्यात्मिक व्याख्यानामध्ये त्यांनी धर्मग्रंथात तसेच श्रीमद् भगवदगीता, ज्ञानेश्वरी, तुकोबराया गाथा, भागवत, रामायण, महाभारत, ग्रामगीता अशा धर्मग्रंथातील दाखले दिलेले आहेत. आज पाहतो तर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपले कीर्तन प्रवचनाच्या व इतर अध्यात्मिक व्याख्यानाच्या माध्यमातून हागणदारी मुक्त गाव, देश-राज्य स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, पाणी आडवा पाणी जिरवा, पर्यावरणाचे रक्षण, तसेच स्त्रीभ्रूणहत्या अशा विविध क्षेत्रातील कामगिरी केलेली आहे. मग चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून केवळ वारकरी संप्रदाय व हिंदू धर्माला शह देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाराजांवर दाखल करण्यात आलेला खटला मागे घेण्यात यावा, अशी मागणी येवला तालुक्यातील सर्व वारकरी व महाराज मंडळी व इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी या मागणीचे निवेदन येवल्यातील नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details