येवला (नाशिक ) -एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नसून कर्मचारी आंदोलनावर (ST Workers Strike) ठाम आहेत. या आंदोलन दरम्यान विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (st workers suicide) केल्या. अशा कर्मचाऱ्यांना येवला येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर भव्य रांगोळी काढत व दिवे प्रज्वलित करून अनोखी श्रद्धांजली वाहिली.
गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संप चालू आहे. या काळात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना येवला आगाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी येवला आगाराच्यावतीने एसटी लोगोमध्ये महाराष्ट्र शासन नाव टाकून रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच पणत्या व मेणबत्त्या पेटवून आत्महत्या झालेल्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.