नाशिक - देशभरात लॉकडाऊन सुरू असताना कुठलीही वाहने अथवा सहजासहजी परगावात, दुसऱ्या जिल्ह्यात जाणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत टपाल खात्याकडून अत्यावश्यक सेवा प्रत्येक गावात पुरवली जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात येवला टपाल खात्याची सेवा, रुग्णाला घरपोच पोहचवले औषध - post office nashik
लॉकडाऊनसारख्या कठिण परिस्थितीध्ये नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून येवला तालुक्यातील टपाल खात्याने महत्वाच्या सुविधा घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. टपाल विभागात असणाऱ्या एईपीएस या प्रणालीमार्फत ग्राहकांना आम्ही घरपोच सुविधा देऊन सर्व नियमांचे पालन केल्याचं ते सांगताहेत.
येवल्यातील एका व्यक्तीची खूप महत्वाची औषधी स्पीड पोस्टने नाशिकहुन येवला येथे टपाल खात्याच्या एमएमएस या वाहनाने मागवून ते पोस्टमन अरुण गुंजाळ यांनी घरी जाऊन दिली. त्यामुळे डाकसेवा ही जनसेवा, बघण्यास मिळाली. तसेच शहरातील लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सतत चांगली सेवा ग्राहकांना देण्याचे काम पोस्टमन करत आहेत. मनमाड उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अंदरसुल, नगरसुल, येवला, मनमाड, नांदगाव आणि न्यायडोंगरी या टपाल विभागातील सर्व पोस्टमन व ग्रामीण भागातील टपाल सेवक हे लॉकडाऊन काळातही केंद्र सरकारने गरीब, दिव्यांग जनतेच्या खात्यात टाकण्यात येणारे 500,1 हजार रुपये घरपोच दिले आहेत. अशा लोकांना बँकेत तासनतास उभे राहावे लागते. परंतु टपाल विभागात असणाऱ्या एईपीएस या प्रणालीमार्फत ग्राहकांना आम्ही घरपोच सुविधा देऊन सर्व नियमांचे पालन केल्याचं ते सांगताहेत.
23 मार्च ते 30 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत पंतप्रधान जनधन योजना, राज्य शासनाच्या विविध योजना, तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, उज्वला योजना या खात्यातील 45 लाख 27 हजार 570 रुपये ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवण्यात आली आहे. ही रक्कम मनमाड उपविभातील सर्व टपाल विभागामधून डाकसेवक व शहरातील पोस्टमन यांच्यामार्फत घरपोच पोहचवण्यात आल्याचे मनमाड टपाल विभागाचे टपाल निरीक्षक राजेंद्र वानखेडे यांनी सांगितले. तसेच मालेगाव विभागाचे टपाल अधीक्षक रेड्डी यांनी जनतेला ग्राहकांनी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी करायची गरज नाही. त्यांनी आपल्या जवळच्या पोस्टमनला फोन करून इतर बँकेतील पैसे आपल्या मोबाईल व आधार क्रमांकच्या साह्याने एईपीएस या प्रणालीद्वारे घरपोच पैसे तुम्हाला मिळू शकतील, असे आवाहन केले आहे.