महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला-मनमाड रोडवर लूटमार करणारे आरोपी जेरबंद - येवला- मनमाड रोडवरील लूटमार घटना

जिल्ह्यातील मनमाड रोडवर लूटमार करणाऱया आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आपल्या साथीदाराची ओळख सांगितली आहे. आकाश संजय गायकवाड (वय २१, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि मनोज गोरख मांजरे (रा. मतापूर, ता. श्रीरामपूर,जि. अहमदनगर) आरोपींची नावे आहेत.

नाशिक
नाशिक

By

Published : Jul 25, 2020, 3:02 PM IST

येवला ( नाशिक ) - जिल्ह्यातील मनमाड रोडवर लूटमार करणाऱया आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आकाश संजय गायकवाड आणि मनोज गोरख मांजरे, अशी आरोपींचे नावे आहेत.

गेल्या वर्षी 14 डिसेंबरला (१४/१२/२०१९) एक व्यक्ती येवला- मनमाड रोडवर अनकाई फाट्याजवळ उभा असताना दोन अनोळखी इसमांनी त्याला कुऱ्हाडीचा धाक दाखवून रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेला. याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वी ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे येवला शहरातून एका संशयित गुन्हेगारांस ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आपल्या साथीदाराची ओळख सांगितली आहे. आकाश संजय गायकवाड (वय २१, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि मनोज गोरख मांजरे (रा. मतापूर, ता. श्रीरामपूर,जि. अहमदनगर) आरोपीची नावे आहेत.

सदर गुन्ह्यात जबरीने हिसकावून नेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच दोन्ही आरोपींवर यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान दुसरा आरोपी मनोज मांजरे हा अहमदनगर जिल्ह्यातील तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यात अटक आहे.

नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ .आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे तसेच उपधीक्षक समिरसिंग साळवे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details