नाशिक Yeola Horse Market : नवरात्रीत सगळीकडं उत्साहाचं वातावरण असतं. या जल्लोषानं भारलेल्या वातावरणातच येवल्यात घोड्यांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो. घोडे खरेदी करण्यासाठी देशभरातून व्यापारी येवल्यात घोडे खरेदी करण्यासाठी येतात. हा घोड्यांचा बाजार 350 वर्षांपूर्वी येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी सुरू केला आहे. येवला बाजार समितीच्या आवारात दसऱ्याच्या हा बाजार भरतो.
सतराव्या शतकापासून भरतो घोडे बाजार :येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा दसऱ्याच्या अगोदरच्या मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती. नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो, त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडेबाजारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी इथं घोडे खरेदी- विक्रीसाठी दाखल झाले आहेत. चेन्नई, कर्नाटक, पंजाब, काठेवाडी, गुजरात, पंजाब, माथेरान अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले आहेत. हा सर्वात मोठा नवरात्र उत्सवाच्या काळात भरणारा घोड्याचा बाजार आहे.
- घोड्यांचे सजावट साहित्यदेखील दाखल :या येवला शहरात भरवण्यात येणाऱ्या घोडेबाजारामध्ये हजारो घोडे दाखल होत आहेत. या घोड्यांना सजवण्यासाठी लागणारं सजावट साहित्याची दुकानं थाटण्यात आली असल्यानं मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी हे साहित्य खरेदी करताना बाजार समितीत दिसून आलं.