नाशिक -येवला तालुक्यातील सायगाव गावातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती एल्गार परिषद घेऊन आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. कर्जमाफी मिळावी, पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी अशा मागण्या शेतकऱ्याने केल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
येवल्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावरुन सरकारविरोधात फुंकले रणशिंग हेही वाचा - 'क्यार' नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे सावट
दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील शेतकरी गारपीट आणि मुसळधार पावसामुळे हवालदील झाला आहे. विविध शेतकरी संघटनांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रोजगार मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीक कर्ज मिळावे अशा विविध मागण्यांसाठी किसान क्रांती एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी