येवला : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर या शेतकऱ्याने 70 गुंठ्यामध्ये सीताफळांची 600 झाडांची लागवड केली. याद्वारे हा शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहे. या सीताफळांची ग्रेडीग व पॅकिग योग्य पद्धतीने करून सदर सीताफळे बांग्लादेश येथे निर्यात केली जात ( Yeola Custured Apple Export to Bangladesh ) आहेत.
Custured Apple : येवल्यातील सीताफळांची बांगलादेश वारी; ६०० झाडांतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न - Huge Income From Custured Apple Cultivation
येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर या शेतकऱ्याने 70 गुंठ्यामध्ये सीताफळांची 600 झाडांची लागवड केली. याद्वारे हा शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहे. या सीताफळांची ग्रेडीग व पॅकिग योग्य पद्धतीने करून सदर सीताफळे बांग्लादेश येथे निर्यात केली जात ( Yeola Custured Apple Export to Bangladesh ) आहेत.
बारावीपर्यंत शिक्षण :येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील प्रगतिशील शेतकरी योगेश सूर्यभान इप्पर या तरूण शेतकऱ्यांने फळबाग लागवड केली व त्यातुन त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यानंतर त्यांनी आधुनिक शेती अगदी चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली. शेतात नवनवीन प्रयोग करत शेतीमध्ये भरघोस उत्पन्न काढत ( Huge Income From Custured Apple Cultivation ) आहे. त्यामध्ये प्रथम त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीने ०.७० गुंठ्यावरती गोल्डन सीताफळाची लागवड केलेली आहे. सिताफळ झाडांची संख्या ६०० असून त्यामध्ये त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्याची ग्रेडीग व पॅकिग योग्य पद्धतीने करून सदर फळे बांग्लादेश येथे निर्यात केले जातात.