महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरपट्टी माफ करा, येवला व्यापारी महासंघाची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी - नाशिक महापालिक

येवला नगरपालिका हद्दीतील घरपट्टी व नगरपालिकेचे गाळेधारक यांचे भाडे माफ करावे, अशा मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना येवला व्यापारी महसंघाच्या वतीने देण्यात आले आहे.

घरपट्टीसह गाळेधारकांचे भाडे माफ करावे, येवला व्यापारी महासंघाची नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे मागणी
घरपट्टीसह गाळेधारकांचे भाडे माफ करावे, येवला व्यापारी महासंघाची नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

By

Published : Jun 9, 2021, 6:36 PM IST

येवला - नगरपालिका हद्दीतील घरपट्टी व नगरपालिकेचे गाळेधारक यांचे भाडे माफ करावे, अशा मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना येवला व्यापारी महसंघाच्या वतीने देण्यात आले आहे.


'घरपट्टी व नगरपालिकेचे गाळेधारक यांचे भाडे माफ करावे'

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येवला शहरात (2020-2021) या आर्थिक वर्षामध्ये सर्व नागरिक व व्यापारी वर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिकांसह भाडेतत्त्वावर असलेली गाळेधारक व इतर व्यापारी वर्गाला पूर्ववत येण्याकरता बराच कालावधी लागणार आहे. दरम्यान, यामध्ये नगरपालिका थकीत भाडे व घरपट्टी यामध्ये 24 टक्के व्याज वसूल करत आहे. यासंदर्भात नगरपालिका विभागासी चर्चा केली. दरम्यान, नगर विकास विभाग यांच्यामार्फत आम्हाला आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे आम्ही व्याजात सूट देऊ शकत नाही, गाळेभाडे माफ करू शकत नाही, असे सांगण्यात आले. यावर, नागरिक, व्यापारी व त्यांच्या घरपट्टी व गाळे भाडे माफ करणे बाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा. तसेच, भविष्यातही नगरपालिकेकडून या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या व्याजाची मागणी किंवा वसुली करू नये, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन येवला व्यापारी महसंघाच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details