नाशिक - सरते वर्ष नाशिक जिल्ह्यासाठी ( Nashik district ) कही खुशी कही गम असेच ठरले. साहित्य संमेलनाचे यशस्वी शिवधनुष्य नाशिकने पेलले. तर कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नूकसान झाले. कोरोनाच्या दुसर्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजवला. पण, उशीरा का होईना जिल्ह्याने या लाटेवर मात केली. अतिवृष्टी व अवकाळीने शेतकर्यांना मोठा फटका बसला. रेव्ह पार्ट्यांमुळे निसर्ग सौंदर्याने नटलेले इगतपुरी चर्चेत आली. तसेच केंद्रीय मंत्री राणेंविरुध्द नाशकात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यामुळे नाशिक चर्चेत आले. जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप, असा संघर्ष पहायला मिळाला. सरत्या वर्षाचा घेतलेला हा 'फ्लॅश बॅक'...
केंद्रीय मंत्री राणेंवर नाशकात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Central Minister Narayan Rane ) यांनी असभ्य भाषेत टीका केल्याप्रकरणी महानगरप्रमुख बडगुजर यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी राणेंच्या विरोधात गुन्हा दाख केला. कारवाई पक्ष पाहून नाही तर कायद्यानुसारच केली जाईल, अशी प्रतिक्रिया पाण्डेय यांनी दिली होती.
अभिनेत्री हिना पांचाळसह 12 महिलांना रंगेहाथ पकडले
इगतपुरी रेव्ह पार्टी ( Igatpuri Rev Party ) प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह ( Heena Panchal ) 12 महिलांना अटक करण्यात आली होती. त्यात एक इराणी कोरिओग्राफर महिला आणि चार दाक्षिणात्य सिनेमात भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींचा समावेश होता. कोरोना नियमांचे उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते.
राज ठाकरेंसोबत चंद्रकात पाटील यांचे 'मार्निंग वाॅक'
आगामी निवडणुकीत भाजप-मनसेला टाळी देणार का..? हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मनसेप्रमुख राज ठाकरे व भाजप नेते चंद्रकांत पाटील ( Raj Thackeray and Chandrakant Patil Meeting ) विश्रामगृह परिसरात मार्निंग वाॅक केला होता. भविष्यात या दोन्ही पक्षांत युती झाली तर मार्निंग वाॅक त्या घडामोडीचा टर्निंग पाईंट नक्कीच ठरेल.
ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांच्यावर शाईफेक
ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांच्यावर संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई ( Ink Thrown on Girish Kuber ) फेकली. मराठी साहित्य संमेलनाच्या ( Marathi Sahitya Sammelan 2021 ) व्यासपिठाच्या मागे ही घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली होती.
ऑक्सिजन गळतीने झाला स्फोट