नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 'अवार्ड ऑफ इन्स्टिट्युशनल एक्सलन्स' या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या जगातील 53 देशांनी एकत्रित गठीत केलेल्या या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नाशिक : अवार्ड ऑफ इन्स्टिट्युशनल एक्सलन्स पुरस्काराने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गौरव हे ही वाचा -ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री
विद्यापीठाने 2002 साली देखील हा पुरस्कार पटकावला होता. आता दुसऱ्यांदा पुन्हा याच विद्यापीठाला पुरस्कार मिळल्याने या विद्यापीठाचे वर्चस्व वाढले आहे. या विद्यापीठात कारागृहातील बंदीजन, दृष्टीबाधित, मागासवर्गीय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. याच कार्याची दखल घेत विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हे ही वाचा -'EVM मध्ये घोळ करण्यासाठी दोन दिवसांनी मतमोजणी होणार आहे का?'