महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक पासवर्ड दिन : अशा काही टिप्स ज्या तुम्हाच्या माहितीला सुरक्षित ठेवतील..

पासवर्डबाबत नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याविषयी नाशिकचे सायबर एक्स्पर्ट तन्मय दीक्षित यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

By

Published : May 3, 2019, 11:08 AM IST

वर्ल्ड पासवर्ड डे

नाशिक - आपण आपल्या मौल्यवान गोष्टी ज्याप्रमाणे सुरक्षित ठेवतो त्याचप्रमाणे सोशल मीडिया अकाउंट, बँक डिटेल्स, ई-मेल, मेमरी कार्ड, हार्ड डिक्स आणि फाइल्स देखील सुरक्षित ठेवतो. मात्र, तरीही अनेकदा फसवणूक होण्याच्या घटना घडत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले पासवर्ड कसे सुरक्षित ठेवावे याबाबत अनेकदा पोलिसांकडून सुद्धा जनजागृती केली जाते.

जागतिक पासवर्ड दिन

दिवसागणिक सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आपण आपले पासवर्ड हे व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवत नाही. पासवर्ड सार्वजनिक करतो, याबाबत नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याविषयी नाशिकचे सायबर एक्स्पर्ट तन्मय दीक्षित यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी...

  • पासवर्ड हा कोणासोबत शेअर करू नये
  • प्रत्येक वेबसाईट, अॅप्लिकेशन, मोबाईल, कॉम्प्युटर, तसेच ज्यात डेटा सेव्ह केला जातो, या सर्वांसाठी पासवर्ड हा वेगवेगळा असणे आवश्यक आहे..
  • पासवर्डमध्ये कमीत कमी नऊ ते १० अक्षर असावीत. यात दोन लहान अक्षरे, दोन मोठी अक्षरे, दोन आकडे, दोन रिकाम्या जागा, दोन स्पेस कॅरेक्टर असा एकत्रित स्ट्रॉंग पासवर्ड तयार करावा
  • पासवर्ड नियमितपणे बदलत राहावा, आवश्यकता असल्यास पासवर्ड मॅनेजर अॅप वापरले तरी चालेल..
  • पासवर्ड सहजपणे लक्षात असा राहावे यासाठी एखादे गाणे, म्हणीचे पाहिले अक्षर एकत्र केले तरी चालेल
  • पासवर्ड कुठेही सेव्ह करून ठेवू नये कोणत्याही कागदावर लिहून ठेवू नये.
  • पासपासवर्ड टाईप करताना त्यावर हात झाका जागा आणि पासवर्ड टाईप करा.
  • पासवर्ड ऑटोमॅटिक सेव्ह होणार नाही याची काळजी घ्या.

ABOUT THE AUTHOR

...view details