महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील घटना - Women injured in leopard attack at Devthan

गुरूवारी(16 जानेवारी) सदर महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी  गेली होती. जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर झेप घेत हल्ला केला. यात त्यांच्या मानेला, हाताला, पाठेला व पायाला गंभीर जखमा झाल्या. रेशमा यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे बघताच बिबट्याने धूम ठोकली.

मृत रेशमा चंदर महाले
मृत रेशमा चंदर महाले

By

Published : Jan 18, 2020, 3:34 AM IST

नाशिक - बिबट्याच्या हल्यात दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथे महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेशमा चंदर महाले (वय ४५), असे जखमी महिलेचे नाव आहे.

गुरूवारी(16 जानेवारी) सदर महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी गेली होती. जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर झेप घेत हल्ला केला. यात त्यांच्या मानेला, हाताला, पाठेला व पायाला गंभीर जखमा झाल्या. रेशमा यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे बघताच बिबट्याने धूम ठोकली.

हेही वाचा -कुऱ्हाकाकोडा शिवारात बिबट्याची पिल्ले आढळल्याने खळबळ

रेशमा यांना तत्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ कारवाई करत बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details