महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

सविता मुर्तडक यांनी एका चोराला चोरी करण्यास प्रतिकार करत पळवून लावले. चोराच्या हातात चाकू असतानासुद्धा सविताने दुर्गावतार धारण करत ताकदीने त्याचा सामना केला. हा सर्व प्रकार सविता यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार देखील केला

By

Published : May 31, 2019, 10:20 AM IST

Updated : May 31, 2019, 12:49 PM IST

नाशिक- सातपूर परिसरातील अशोकनगर भागात राहणाऱ्या सविता मुर्तडक यांनी एका चोराला चोरी करण्यास प्रतिकार करत पळवून लावले. चोराच्या हातात चाकू असतानासुद्धा सविताने दुर्गावतार धारण करत ताकदीने त्याचा सामना केला. हा सर्व प्रकार सविता यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनीदेखील या महिलेच्या धाडसाचे कौतूक केले. तसेच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सविता यांचा सत्कार देखील केला आहे.

व्हिडिओ : नाशकात महिलेचा दुर्गावतार; चाकूधारी चोरट्याला शिकवला धडा

अनेकदा एखादे संकट आले तर माणूस हा घाबरून शांत बसतो किंवा मोठ्या हिंमतीने संकटाचा सामना करतो, अशीच एक घटना नाशिकच्या सातपूर भागातील अशोकनगर परिसरात घडली आहे. सविता मुर्तडक यांचे ग्राहक सेवा केंद्र असून बँकेसंदर्भांत कामे येथे केली जातात. काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास एक चोराने तोंडावर रुमाल लावून सविता यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाची कडी लावून सविता यांना चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली. पैसे देण्यास सविता यांनी नकार दिला असताना या चोराने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि एका हाताने टेबलच्या ड्रॉव्हरमधून चाळीस हजार रुपये काढून घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान सविता यांनी दुर्गावतार घेत या चोराचा जोरदार सामना करत आपल्यापेक्षा धष्टपुष्ट असलेल्या चोराला चार वेळा खाली पाडले. सविता यांचा आक्रमक पवित्रा बघून चोराने सविता यांचा मोबाइल फोडून पैसे घेऊन फरार झाला. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाल्याने काही दिवसांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी देखील या महिलेच्या धाडसाचे कौतुक करत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रणरागिणी सविता यांचा सत्कार केला.

Last Updated : May 31, 2019, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details