नाशिक - ओम्नी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना येवला-मनमाड मार्गावरच्या तांदुळवाडी फाट्याजवळ घडली. सुरेखाबाई कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव असून, त्या धुळे येथील रहिवासी होत्या. घटनेनंतर गाडी चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
येवला-मनमाड रोडवर ओमनी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिलेचा मृत्यू
ओम्नी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना येवला-मनमाड मार्गावरच्या तांदुळवाडी फाट्याजवळ घडली. सुरेखाबाई कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे.
ओमनी व्हॅनच्या धडकेत साईभक्त महिला ठार
गुरुपौर्णिमेनिमित महिला धुळे ते शिर्डी पायी दिंडीत साईबाबांच्या दर्शनासाठी जात होती. यावेळी मागून ओम्नी गाडीने जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. रविवारी याच येवला-मनमाड महामार्गावर वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन ८ वारकरी गंभीरपणे जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा अपघात झाल्याने येवला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.