नाशिक- येवला येथील अभियांत्रिकी पदवी असलेल्या विवाहितेने पती व पतीच्या प्रेयसीच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा महाले, असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडिल बाळासाहेब महाले यांनी दिलेल्या तक्ररीवरून पूजाच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
पतीच्या प्रेमसंबंधामुळे इंजिनिअर पत्नीची आत्महत्या हेही वाचा - नाशिककरांना हवे स्थिर सरकार
याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा महाले (रा. हस्ते दुमाला ता. दिंडोरी) यांचा विवाह येवल्यातील शेखर संजय शिंदे यांच्याबरोबर 17 मे रोजी झाला होता. विवाहानंतर शेखर एका मुलीशी वारंवार फोनवर बोलायचा. याबाबत पूजाने शेखरला जाब विचारला. मात्र, शेखर त्या मुलीशी त्यानंतरही बोलतच होता. दरम्यान, पूजा ही भाऊबीजेसाठी माहेरी गेली असता, तिला तू परत येऊ नको, तुला घटस्फोट देणार आहे, असे तिच्या पतीने सांगितले. त्यामुळे चिंतेत पूजाने विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले नाशिकचे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर
याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साहेबराव वडजे, पोलीस शिपाई किरण घुळे करत आहेत