नाशिक -सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. 22 मार्च नंतर जवळपास संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व छोटे, मोठे व्यवसाय बंद असल्याने गोरगरिबांना एक वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. यात मनमाड शहरातील गुरुद्वारा जवळपास रोज ५००० हजार लोकांना अन्न पुरवत आहे. या कार्यास आपला काही हातभार लागावा म्हणून हुडको सावरकर नगर, शिवाजी नगर येथील महिला मंडळीने 'एक घर-एक पोळी', असा उपक्रम सुरू केला. त्यास शहरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व रोज जवळपास ७००० च्या वर पोळ्या महिला मंडळ जमा करून गुरुद्वाराकडे सुपूर्द करत आहे.
'एक घर-एक पोळी' उपक्रमाद्वारे महिला दररोज करतात ७ हजार चपात्याची मदत
कोरोना आला आणि गोरगरीब यांचे सुरू होते ते व्यवसाय देखील बंद पडले आहेत. कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पोट कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. घरातील लहान लेकरे, म्हातारे यांच्या दोन वेळच्या जेवणाची चिंता वाढली. त्यात नगीना मशीद, गुरुद्वारातील दानशूर धावून आले.
कोरोना आला आणि गोरगरीब यांचे सुरू होते ते व्यवसाय देखील बंद पडले आहेत. कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पोट कसे भरायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. घरातील लहान लेकरे, म्हातारे यांच्या दोन वेळच्या जेवणाची चिंता वाढली. त्यात नगीना मशीद, गुरुद्वारातील दानशूर धावून आले. म्हणून किमान 2 वेळेस अन्न तरी मिळत आहे. रोजच्या गोरगरिबांना अन्न वाटपाच्या कार्यात आपलाही हातभार लागावा, या दृष्टीने महिला सरसावल्या. त्यामधून 'एक घर-एक पोळी', अशी संकल्पना पुढे आली. पहिल्या दिवशी २३०० पोळ्या जमा झाल्या आणि उपक्रम सुरू झाला. आज दहाव्या दिवशी रोज ७००० चपात्या महिलांच्यावतीने जमा करून व्यवस्थित पॅकिंग करून गुरुद्वाराकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.
या कामास आता आजूबाजूला असणाऱ्या गावांकडून प्रतिसाद मिळत असून सटाणे व कर्ही या दोन गावांच्या ग्रामस्थांनी बाजरीच्या भाकरी आणि चपात्या पोहोचविल्या असून रोज या उपक्रमात सहभाग वाढत आहे. गुरुद्वाराच्या माध्यमातून या चपात्या गरजू व्यक्तींना घरपोच दिल्या जात आहे. या उपक्रमात गुरुद्वारा प्रबंधक बाबाजी रणजितसिंग, सीमा नरेश फुलवाणी, सविता साईनाथ गिड्गे, कीर्ती दीपक मकवाने, साक्षी मुलचांदाणी, सोनाली विवेक मकवाने, भारती सज्जन राजपूत, सुरेखा राजू चव्हाण, स्वाती सोनवणे, डॉ. प्रियंका नयन दाभाडे आदी सहभागी आहेत.