महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शववाहिका न मिळाल्याने तरुणीने खासगी वाहानातून स्मशानभूमीपर्यंत नेला आईचा मृतदेह - नाशिकमध्ये कोरोना रुग्ण वाढले

राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला शववाहिका देखील मिळाली नाही. अखेर या महिलेच्या मुलीले आपल्या आईचा मृतदेह स्व:ताच्या कारमधून नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही हृदयद्रावक घटना नाशिकच्या अमृतधाम भागात घडली आहे.

कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, शववाहिका न मिळाल्याने खासगी वाहानातून स्मशानभूमीपर्यंत नेला मृतदेह
कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, शववाहिका न मिळाल्याने खासगी वाहानातून स्मशानभूमीपर्यंत नेला मृतदेह

By

Published : Apr 13, 2021, 5:04 PM IST

Updated : Apr 14, 2021, 3:05 PM IST

नाशिक -राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला शववाहिका देखील मिळाली नाही. अखेर या महिलेच्या मुलीले आपल्या आईचा मृतदेह स्व:ताच्या कारमधून नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही हृदयद्रावक घटना नाशिकच्या अमृतधाम भागात घडली आहे. उषा इंगळे अंस या मृत महिलेचे नाव आहे. ऑक्सिजन बेड वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे महिलेचा मृत्यू, शववाहिका न मिळाल्याने खासगी वाहानातून स्मशानभूमीपर्यंत नेला मृतदेह

उषा डिगंबर इंगळे (70) यांना कोरोनाची लागन झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना ऑक्सिजनचा बेड न मिळाल्याने अखेर त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. निधन झाल्यानंतर 3 ते 4 तास ॲम्बुलन्सला संपर्क साधून देखील ॲम्बुलन्स न मिळाल्याने शेवटी त्यांच्या मुलीने गायत्री डिगंबर इंगळे यांनी आपल्या आईचा मृतदेह कारमध्ये नेवून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

कारमधून मृतदेह नेत आईवर अत्यंसंस्कार

एकीकडे नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती भिषण झाली आहे. कोविड रुग्णालयांमध्ये जागाच नसल्याने, अनेकांचा उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहे. दरम्यान दुसरीकडे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना अंत्यसंस्काराकरता स्माशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शववाहिका देखील उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपल्या आईला स्मशानभूमीपर्यंत आपल्या खासगी वाहानातून घेऊन जाण्याची वेळ गायत्री इंगळे यांच्यावर आली. त्यांनी आपल्या कारमधून आईचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला, व अत्यंसंस्कार केले.

24 तासांमध्ये 350 बेडचं कोविड सेंटर फूल

नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. नाशिकच्या ठक्कर डोम याठिकाणी शनिवारी सुरू करण्यात आलेलं 350 बेडचं कोविड सेंटर 24 तासांमध्ये फूल झाले आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडत असल्यामुळे उपचाराभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व

Last Updated : Apr 14, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details