नाशिक - नाशिकमध्ये आज धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागले आहे. धरणावर धूळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या कश्यपी धरणावर ही घटना घडली आहे.
धूळवड साजरी करताना महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू; कश्यपी धरणावरील घटना - कश्यपी धरणात बुडून महिलेचा मृत्यू
नाशिकमध्ये आज धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागले आहे. धरणावर धूळवड साजरी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. शिल्पा दिवेकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
कश्यपी धरणावर धुळवड खेळायला गेलेल्या महिलेचा मृत्यू-
नाशिकच्या कश्यपी धरणावर नाशिक रोड भागातील दोन महिला आणि दोन पुरुष धूळवड साजरी करायला गेले होते. यावेळी शिल्पा दिवेकर या धरणात पडल्या, त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या तिघांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल दोन तासानंतर या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेने नाशिकमध्ये धुलीवंदनाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.