महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन'; 'त्या' तिघी करतात रोज रेल्वेच्या शँटिंग - मनमाड जंक्शन

मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या ठिकाणी दिवस-रात्र गाड्यांची वर्दळ असते. अनेक गाड्यांना येथून पॉवर (इंजिन) बदलून पुढील प्रवास करावा लागतो. या पॉवर बदलण्यासाठी येथे विशेष पॉईंट्समन म्हणून कर्मचारी आहेत. या विभागात अतिशय कठीण आणि जीवघेणे काम आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते. मात्र, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विभागात तीन महिलांनी येऊन आपणही हे काम करू शकतो, असे दाखवत महिलांना कमी लेखू नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन
पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन

By

Published : Mar 8, 2020, 2:00 PM IST

Updated : Mar 8, 2020, 6:50 PM IST

मनमाड (नाशिक) - रेल्वेच्या 'पॉईंट्समन'चे काम तसे बघता एकदम हार्ड आणि जीवघेणे, यात आजपर्यंत पुरुषांचीच मक्तेदारी होती. परंतु, मनमाड रेल्वे स्थानकावरील 'त्या' तिघींना बघून महिलाही पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. राधा बेलदार, दिपाली लोंढे, मोहना महातो या तिघींनी सकाळ, दुपार आणि चक्क रात्रपाळी करत एक वेगळाच आदर्श समाजासमोर उभा केला असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इतर महिलाही आता या विभागामध्ये काम करण्यासाठी तयार होत आहेत.

'पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन'

मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या ठिकाणी दिवस-रात्र गाड्यांची वर्दळ असते. अनेक गाड्यांना येथून पॉवर (इंजिन) बदलून पुढील प्रवास करावा लागतो. या पॉवर बदलण्यासाठी येथे विशेष पॉईंट्समन म्हणून कर्मचारी आहेत. या विभागात अतिशय कठीण आणि जीवघेणे काम आहे. थोडीशी चूक जीवावर बेतू शकते. मात्र, या पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या विभागात या तिघींनी येऊन आपणही हे काम करू शकतो, असे सांगत महिलांना कमी लेखू नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा -जागतिक महिला दिन : महिलांचा कायमस्वरुपी सन्मान राखण्याची गरज

या तिघी पॉईंट्समनसाठी असलेले पॉवर(इंजिन) कटींग पॉवर जॉइनिंग यासह इतर देखील कामे करतात. सकाळी 8 ते 4 दुपारी 4 ते 12 आणि रात्री 12 ते सकाळी 8 अशा तिन्ही पाळ्यांंमध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करतात. सुरुवातीला नवीन असताना थोडा त्रास झाला, मात्र आता काम करण्यात मजा येत असल्याचे त्या सांगतात. कामावर नसताना त्या दिवशी काहीतरी चुकल्यासारखे वाटत असते, असेही त्या आवर्जून सांगतात. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर जसे शंभर टक्के महिला काम करतात तसेच कमीत-कमी आमच्या या पॉईंट्समन विभागात आम्ही सर्व महिलाच तयार करू असेही त्या आवर्जून सांगतात. रेल्वेने या विभागाला जसे पॉइंट्समन म्हणून नाव दिले आहे तसे आता पॉईंट्सवूमन म्हणूनही नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन'

हेही वाचा -महिला दिन विशेष: आदिवासी महिलांच्या गोडंबी व्यवसायातील वास्तव

'सीएनडब्लू' या विभागात कार्यरत असताना त्यांची या ठिकाणी बदली करण्यात आली. सुरुवातीला राग आला मात्र जेव्हा काम केले तेव्हा त्या कामात आम्हाला जास्त आवड निर्माण झाली व आम्ही आता हे काम आवडीने करत असल्याचे त्या सांगतात. आज जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनचे सतीश केदारे, प्रदीप गायकवाड, रत्नादीप पगारे, किरण आहिरे, प्रवीण गेडाम, अर्जुन बागुल, यासह कर्मचाऱ्यांनी त्यांचा आज पुष्पगुच्छ व शॉल देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Mar 8, 2020, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details