महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये 3 सराईत गुन्हेगार जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत - by local crime branch in nashik

श्रावण पिंपळे हा त्याच्या इतर साथीदारांसह लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. चिखलीपाडा परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचुन 2 संशयितांना जागेवरच पकडले. तर पळून चाललेल्या तीन संशयितांपैकी दोघांना पाठलाग करुन शिताफीने पकडण्यात आले. मात्र, तरीही एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

पडकण्यात आलेला मुद्देमाल आणि स्विफ्ट कार

By

Published : Sep 13, 2019, 1:28 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील कळवण ते नांदुरी रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना जिवंत काडतुसांसह स्थानिक गुन्हे शाखा व कळवण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. या सराईत गुन्हेगारांकडुन हत्यारांसह दोन मोबाईल फोन, 14 हजार 707 रुपये रोख आणि लाल रंगाची स्विफ्ट कार असा एकूण 3 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला सराईत गुन्हेगार श्रावण पिंपळे याचाही समावेश आहे.

नाशिकमध्ये जिवंत काडतुसे, ३ लाखांच्या मुद्देमालासह सराईत गुन्हेगार जेरबंद

हेही वाचा -अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट

तर श्रावण पिंपळे हा त्याच्या इतर साथीदारांसह लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. चिखलीपाडा परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचुन 2 संशयितांना जागेवरच पकडले. तर पळून चाललेल्या तीन संशयितांपैकी दोघांना पाठलाग करुन शिताफीने पकडण्यात आले. मात्र, तरीही एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

हेही वाचा -नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दोन गणेशभक्त बुडाले

पकडलेल्या संशयितांमध्ये श्रावण सुरेश पिंपळे, सोहेल उर्फ सोहेब अन्सार मणियार, गणेश शंकर पिंपळे, किरण शिवपांडु अहिरे यांचा समावेश आहे. तर गणेश तेलोरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये व गुन्हेगारांच्या अंगझडतीत देशी बनावटीचे एक पिस्टल, एक जिवंत काडतुस, धारदार चॉपर, लोखंडी टॉमी, लोखंडी कटावनी, स्क्रु-ड्रायव्हार व लोखंडी पाना असे साहित्य मिळून आले आहे.

हेही वाचा -वीज कोसळून आठ मुलांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी...

या आरोपींनी दिलेल्या कबुलीवरुन कोपरगार,राहता व निफाड शहर पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील व कळवणचे पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही धडक कारवाई करुन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

श्रावण होता पाच महिन्यांपासून फरार -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निफाड पोलीस ठाणे हद्दीतून सराईत गुन्हेगार श्रावण उर्फ सावण्या सुरेश पिंपळे (नैताळे ता.निफाड) हा निफाड न्यायालयात सुनावणीनंतर न्यायालयाच्या बाहेरुन पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. पळून गेल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात लुटमार, घरफोडा व वाहनचोरी असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांच्याकडे सापडलेली स्विफ्ट कार ही अस्तगाव तालुका राहता येथून जबरदस्तीने चोरुन आणल्याची कबुली दिली आहे. तर त्याला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा तपास सुरू होता.

ABOUT THE AUTHOR

...view details