महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2023, 9:59 PM IST

ETV Bharat / state

Vegetables QR Code : रानभाज्या बनवायला येतात का? नसेल येत तर हा QR Code स्कॅन करा अन्...

शहरातील नागरिकांना रानभाज्या मिळाव्यात यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने ‘रानभाज्या महोत्सव’ आयोजित केला जातो. शहरातील नागरिकांना रानभाज्या उपलब्ध करून दिल्या असल्या तरी अनेकांना या भाज्या कशा करायच्या याची पद्धत माहिती नसते. त्यामुळे आता रानभाज्यांची रेसिपी 'क्यूआर कोड'च्या माध्यमातून एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

Nashik News
रानभाज्या महोत्सव

नाशिकमध्ये रानभाज्या महोत्सव

नाशिक : जिल्हा परिषदेच्यावतीने उमेदवार जीवन्नती अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षापासून शहरात 'रानभाज्या महोत्सव' आयोजित केला जात आहे. या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागात तयार होणाऱ्या भाज्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिक पंचायत समितीच्या कार्यालयात या रानभाज्यासह इतर वस्तूंचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत. मागील दोन वर्षापासून या महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, त्या भाज्या बनवण्याची पद्धत मात्र अनेक लोकांना माहिती नव्हती. त्यामुळे यावर्षी 'क्यूआर कोड'द्वारे भाज्यांची रेसिपी युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या रानभाज्या महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.



पाथरी भाजी

साहित्य :पाथरी चिरलेली भाजी, मीठ, ताक, हिरवी मिरची, साखर, चणाडाळ, शेंगदाणे, तेल, बेसन, मेथी, हिंग, मोहरी, हळद

कृती : कढई तापत ठेवून त्यात तेल घाला, तेल तापले की त्यात जिरे आणि वाटलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या, नंतर त्यात भाजी टाकून चणाडाळ व मीठ घालून दोन ते तीन मिनिटे ठेवून गॅस बंद करावा.



शेवगा भाजी
साहित्य : शेवग्याची कोवळी दहा पाने, तांदळाचे पीठ चार कप, तिखट, मीठ, हळद इत्यादी
कृती : शेवग्याची पाने कोवळी घ्यावी, नंतर त्यात चार कप तांदळाचे पीठ घालावे, नंतर एक वाटीत पीठ व पाणी घेऊन त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळून ते पीठ मळून घ्यावे, व त्यात तिखट, मीठ व हळद मिसळून घ्यावी. नंतर त्याचे पराठ्याच्या आकारानुसार जाड पोळी तयार करून घ्यावी, तव्यावर पूर्ण शिजेपर्यंत काळपट होईपर्यंत शिजवून घ्यावी, अशा प्रकारे सुंदर चविष्ट पराठे तयार करावे.



करटोली भाजी
साहित्य : हिरवी कोवळी करटोली, खोबरे,अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी हिंग, मोहरी, हळद, जिरे, दोन चिरलेल्या मिरच्या, लाल तिखट, साखर, तेल
कृती : करटोली धून बारीक कापून घ्यावी, तेल गरम करून हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी द्यावी, त्यानंतर कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट घालून चांगले परतावे. चिरलेली करटोली घालून पुन्हा परतावे. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी, नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता तीन ते चार मिनिटे भाजी परतावी व नंतर वरून ओले खोबरे व थोडी साखर घालावी, अशा प्रकारे सुंदर चविष्ट करटोली भाजी तयार होईल.


रानभाज्या महोत्सवात रानभाज्यांची रेसिपी ही 'क्यूआर कोड'च्या माध्यमातून दिली आहे. नाशिककरांनी महोत्सवास भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे - आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी

महिलांना मिळाला मंच - नाशिकमध्ये सध्या हा रानभाज्या महोत्सव सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील खेड्या गावातील महिलांना यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळत आहे. तसेच यातून त्यांना चांगले पैसेही मिळत असल्याचे त्या सांगतात. नाशिकमधील या आगळ्यावेगळ्या महोत्सवाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Nanded News : चर्चा तर होणारच! तीस गुंठे शेतात केली वांग्याची लागवड; चार लाखाचे काढले उत्पन्न
  2. Nanded News: शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन; यासाठी केला देशी जुगाड
  3. नांदेडमध्ये विदेशी फळ भाजीचा प्रयोग; बीजोत्पादनातून लाखो रुपयांचा नफा

ABOUT THE AUTHOR

...view details