महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्या तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यावर पीक राखण्याची वेळ, प्राण्यांचा बदोबस्त करण्याची मागणी - वन्यप्राण्यांमुळे शेत धोक्यात येवला

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये येऊन पिकांची नासाडी करत आहेत. वनविभागाने वनहद्दीला तार कंपाउंड करावे, तसेच पिकांची नासाडी करणाऱ्या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

wild animals destroying field yeola
वन्यप्राण्यांमुळे शेत धोक्यात येवला

By

Published : Jul 25, 2022, 12:27 PM IST

येवला ( नाशिक ) - येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये येऊन पिकांची नासाडी करत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांवर दिवसरात्र या पिकांची राखण करून वन्यप्राण्यांना हकालण्याची वेळ आली आहे.

माहिती देताना शेतकरी

हेही वाचा -Yeola Political News : येवल्यात युवासेनेला धक्का; पदाधिकारी शिंदे गटात दाखल

येवला तालुक्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्याने पेरणी केली. मात्र, पीक उगण्यास सुरुवात होताच हरणांसह इतर वन्य प्राणी पिकांची नासाडी करत असल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांवर आपल्या पिकांची दिवस रात्र राखण करण्याची वेळ आली आहे. हरणांना हाकलावे लागत असून पिकांच्या रक्षणासाठी शेतातच झोपडी करून शेतकऱ्याला राहावे लागत आहे. वनविभागाने वनहद्दीला तार कंपाउंड करावे जेणे करून येवला तालुक्यातील रेडाळे परिसरासह पूर्व भागात वनक्षेत्रा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होणार नाही. पिकांची नासाडी करणाऱ्या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

हेही वाचा -Students Travel Flood Waters : विद्यार्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details