नाशिक : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला ब्लकमेल करत साडे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला (wife blackmailing husband in Nashik) आहे. पत्नीने प्रियकराशी संगनमत करत स्वतःचे नग्न अवस्थेतील फोटो पतीला पाठवत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात पत्नी व प्रियकर विरोधात अंबड पोलीस ठाण्यातगुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
तपास सुरू :या प्रकरणी पीडित पतीने दिलेल्या तक्रानुसार एक अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला, तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांची खाजगी फोटो आणि खास क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे, असे सांगून संशोधने पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास पैशाची मागणी केली. फिर्यादीने समाजात बदनामी नको, या भीतीपोटी 4 लाख 50 हजार रुपये दिल्याच्या तक्रारीत क्रमांक कुठला आहे, याबाबत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू (blackmailing husband by sending Self nude photos) आहे.