महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Husband Murder Case Nashik : पतीला गाढ झोपेत असताना पत्नीने मुलासोबत मिळून धाडले यमसदनी; हत्येचे 'हे' धक्कादायक कारण - महिलेशी अनैतिक संबंध

पतीचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने प्रहार करून खून केला. ही घटना नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौक, यशवंतनगर येथे सोमवारी पहाटे पाचवाजेच्या सुमारास घडली.

Husband Murder Case Nashik
पतीचे हत्याकांड

By

Published : Jul 10, 2023, 5:51 PM IST

पतीच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

नाशिक :मृत दादाजी गवळी (वय 41, रा. समृद्धी प्लाझा, मूळ रा. साक्री, जि. धुळे) याचे यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याच कारणावरून पत्नी व त्याच्यात नेहमी भांडण होत होते. दादाजी गवळी यांचा त्यांच्याच मेहुण्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नी सुनीता आणि मुलगा विशाल यांना संशय होता. यावरून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. मध्यंतरी दोघांमध्ये वाद मिटवण्यात आले होते. मात्र, पत्नी सुनीता गवळी (३७) व मुलगा निशांत (वय २०) यांनी तो राग मनात धरून सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बेडरूममध्ये गाढ झोपेत असलेले दादाजी गवळी यांच्या डोक्यात मुसळीने प्रहार करत खून केला.

खुनाचा गुन्हा दाखल :माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पगारे, महिला निरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. दादाजी गवळी हे अंबड औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत कामाला होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग राजपूत घटनेचा तपास करीत आहेत.

पत्नीकडून पतीची हत्या :अशाच प्रकारच्या काही घटना आधीही घडल्याचे पाहायाला मिळते. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलाच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना 12 फेब्रुवारी, 2022 रोजी शुक्रवारी मुंबई येथे घडली. संतनकृष्णन शेषाद्री (वय 55) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आंबोली पोलिसांनी दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. मृत पतीकडून पत्नीला त्रास होत होता. सततच्या कौटुंबीक त्रासाला कंटाळून पत्नीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी पत्नीने मुलाच्या मदतीने बेडरूमध्ये पतीची बेदम मारहाण केली. त्याचा मृत्यू न झाल्याने सातव्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आले. तसेच भिंतीवरील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आंबोली पोलिसांना एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा फोन आला.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime News: गोरेगावमध्ये धावत्या रिक्षात महिलेवर अत्याचार, उत्तर प्रदेशामधून नराधमाला अटक
  2. Sexual Abuse With Student: तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  3. Mumbai Crime: मसाजच्या नावावर हॉटेलमध्ये बोलावले अन् बंदुकीच्या धाकावर लुटले; वाचा धक्कादायक घटना

ABOUT THE AUTHOR

...view details