महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा छप्पर तोडून बिबट्या घरात दाखल होतो - नाशिक बिबट्या बातमी

मी घराच्या हॉलमध्ये झोपलेलो,आई व बहीण हे दुसऱ्या रूम मध्ये झोपले होते. अचानक किचनमधून आवाज झाला. पण पंख्याच्या आवाजामुळे महिला जाग्या झाल्या नाही. मी मात्र जागा झालो, डोळ्यासमोर बघतो तर कमरे एवढ्या उंचीचा आणि चार फूट लांबीच्या आकाराचा बिबट्या. हालचाल केली तर बिबट्या हल्ला करणार,म्हणून पांघरूणातूनच बिबट्याला पाहत होतो. एवढ्यात बिबट्या माझ्या अंगावरून मुख्य दरवाजाकडे असलेल्या टीव्हीच्या टेबलवर जाऊन बसला. तो अंगावरून जाताना साक्षात मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. मी पांघरूणासह आई झोपलेल्या रूममध्ये पळालो.

छप्पर तोडून बिबट्या घरात दाखल
छप्पर तोडून बिबट्या घरात दाखल

By

Published : Aug 13, 2022, 11:33 AM IST

नाशिक मांजरीचा पाठलाग करीत बिबट्या थेट छप्पर तोडून घरात दाखल झाल्याची घटना देवळाली येथील लहवित भागात घडली. प्रसंगावधान दाखवत घरातील सात जण खिडकीतून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेनंतर गायकवाड कुटुंबाच्या मनात धास्ती बसली आहे. वन विभागाने बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


बिबट्याची नजर चुकवत खिडकी तोडून बाहेर पळाले देवळाली येथील लघवीत येथे राहणारे गायकवाड कुटुंबांना थरार अनुभव आला. 11 तारखेच्या मध्यरात्री 2 वाजता मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट त्यांच्या घराचे छप्पर तोडून त्यांच्या घरातील किचन मध्ये दाखल झाला. समोर उभा असलेल्या बिबट्या बघून घरातील सात सदस्यांनी प्रसंगावधन दाखवत बिबट्याची नजर चुकवत खिडकी तोडून बाहेर पळाले आणि आपला जीव वाचवला. काही वेळानंतर बिबट्या तुटलेल्या सिमेंट पत्र्याच्या मार्गाने घरा बाहेर धूम ठोकली. यानंतर गायकवाड कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.

साक्षात यमदूत होते समोरघरातील सदस्य शुभम गायकवाड यांनी हकीगत कथन केली पावणेदोन वाजेची वेळ, घरात दोन बहिणी त्यांची मुले,आई आणि मी असे सात जण झोपलो होतो. मी घराच्या हॉलमध्ये झोपलेलो,आई व बहीण हे दुसऱ्या रूम मध्ये झोपले होते. अचानक किचनमधून आवाज झाला. पण पंख्याच्या आवाजामुळे महिला जाग्या झाल्या नाही. मी मात्र जागा झालो, डोळ्यासमोर बघतो तर कमरे एवढ्या उंचीचा आणि चार फूट लांबीच्या आकाराचा बिबट्या. हालचाल केली तर बिबट्या हल्ला करणार,म्हणून पांघरूणातूनच बिबट्याला पाहत होतो. एवढ्यात बिबट्या माझ्या अंगावरून मुख्य दरवाजाकडे असलेल्या टीव्हीच्या टेबलवर जाऊन बसला. तो अंगावरून जाताना साक्षात मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. मी पांघरूणासह आई झोपलेल्या रूममध्ये पळालो. त्यानंतर त्यांना बिबट्या आल्याचे सांगितल्यानंतर रूमला असलेली खिडकी तोडून आम्ही बाहेर पडलो. यानंतर काही वेळाने बिबट्या ज्या किचनच्या छप्पर मधून पडला होता, त्याच तुटलेल्या सिमेंटच्या पत्र्यातून त्यांनी बाहेरून धूम ठोकली. मात्र, हा प्रसंग आमच्यासाठी मोठा कठीण होता. वन विभागाने बिबट्याला जेर बंद करावी अशी मागणी आम्ही केली आहे असं शुभम गायकवाड याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details