महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime: प्रेयसीला भेटायला गेला आणि अचानक तिचा पती प्रकटला; हाकनाक जीव गमावला - Mhasrul Police Station

Nashik Crime: नाशिकच्या म्हसरूळ भागात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या 36 वर्षीय प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीच्या घरात गेल्यावर अचानक तिचा पती घरी आला. त्यामुळे आपले बिंग फुटणार या भीतीपोटी त्याने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेत घेतली.

Nashik Crime
Nashik Crime

By

Published : Oct 20, 2022, 7:48 PM IST

नाशिक:नाशिकच्या म्हसरूळ भागात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या 36 वर्षीय प्रियकराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीच्या घरात गेल्यावर अचानक तिचा पती घरी आला. त्यामुळे आपले बिंग फुटणार या भीतीपोटी त्याने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी घेतली, आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

थेट तिच्या घरी गेला :पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हिरावाडी कमलनगरला राहणाऱ्या एका 36 वर्षीय युवकाचे म्हसरूळ भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. दहा ते बारा दिवसांपूर्वी प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता. मात्र त्याचवेळी अचानक तिचा पती दरवाजासमोर आल्याने आपण पकडले जाऊ आणि आता आपले बिंग फुटेल या भीतीपोटी त्याने थेट घराच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी घेतली.

उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या बाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात Mhasrul Police Station अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details