येवल्यात आठवडे बाजार भरतो महामार्गाच्या कडेला, मोठा अनर्थ होण्याची शक्यता
येवला शहरांमधील मंगळवारी आठवडे बाजार करता जागा नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महामार्गाच्या कडेला भाजीपाला विक्री करण्याची वेळ येत असून या बाजारमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून आठवडे बाजार करता जागा दिल्यास त्या ठिकाणी भाजीपाला विक्री करता येईल. जेणेकरून महामार्गाच्या कडेला भाजीपाला विक्री करताना एखादे वाहन जर या बाजारात घुसले तर मोठा अनर्थ होऊ शकतो.
येवला ( नाशिक ) - येवल्यात मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजार करिता शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, येवला शहरात आठवडे बाजार करता जागा नसल्याने अक्षरशा या शेतकऱ्यांना येवला - शिर्डी - नगर महामार्गाच्या कडेला भाजीपाला विकण्याची वेळ येत असल्याने एखादे वाहन या महामार्गाच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांच्या अंगावर गेल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यात बाजारात करता जागा मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आडवडे बाजार जागेकरता मागणी -येवला शहरांमधील मंगळवारी आठवडे बाजार करता जागा नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महामार्गाच्या कडेला भाजीपाला विक्री करण्याची वेळ येत असून या बाजारमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून आठवडे बाजार करता जागा दिल्यास त्या ठिकाणी भाजीपाला विक्री करता येईल. जेणेकरून महामार्गाच्या कडेला भाजीपाला विक्री करताना एखादे वाहन जर या बाजारात घुसले तर मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे हा अनर्थ टाळण्याकरता आठवडे बाजारात करता जागा देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.