महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज

शहरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान काही ठिकाणी तुरळक नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.

येवल्यात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
येवल्यात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By

Published : Apr 10, 2021, 4:05 PM IST

येवला -शहरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान काही ठिकाणी तुरळक नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.

लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद

राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होती. त्यानुसार राज्यात शुक्रवारी 8 वाजल्यापासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. येवल्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. एकूणच लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

येवल्यात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मुख्य चौकात शुकशुकाट

शहरात सकाळपासून रस्त्यावर शांतता पहायला मिळत आहे, शहरातील नेहमी गजबजलेल्या भाजी मार्केट, विंचुर चौफुली, खांबेकर खुंट शनिपटांगण या सर्वच मुख्य चौकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरात कोठेही नाकाबंदी करण्यात आलेली नाहीये, नागरिकांनी घरी राहून या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा -परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; पोलीस महासंचालक संजय पांडे करणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details