नाशिक -मालेगाव येथील साखरपुड्याच्या वऱ्हाड येवला येथून मालेगावकडे जात असताना चोंडी घाटजवळ एका टँकर चालकासोबत कट मारण्यावरून वाद झाला. या वादात ७ वऱ्हाडींना मारहाण झाली. या मारहाणीत ते जखमी झाल्याने संतप्त वऱ्हाडी मंडळीनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे १ तास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी शहर पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. यानंतर जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल कुरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चोंडी घाटजवळ किरकोळ वादातून वऱ्हाडाचा ट्रक अडवून मारहाण - नाशिक पोलीस बातमी
मालेगाव येथील साखरपुड्याच्या वऱ्हाडाचा ट्रक अडवून ट्रक चालकासह वऱ्हाडी मंडळींना मारहाण करण्यात आली. या नंतर संतप्त वऱ्हाडी मंडळीनी रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगाव शहरातील कमालपुरा येथील कमरुद्दीन हाजी शमसुद्दीन शेख यांच्या मुलाचा येवला येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम उरकुन वऱ्हाड मालेगाव परतत होते. यावेळी मनमाड जवळ टँकर ट्रकसमोर आडवा आल्याने ट्रक चालवक आणि टँकर चाल यांच्यात वाद झाला. या वादातून टँकर चालक सुनिल पुंडलिक चोरमले (रा चोंडी) यांनी काही लोकांना सोबात घेऊन चोंडा गावाजवळ ट्रक आडवला. यानंतर टँकर जालकाने ट्रक चालकासह वऱ्हाडी मंडळीना मारहाण केली.
या मारहाणीत हलीमा मुश्ताक अहमद,जुबैदा मोहम्मद अय्युब, एजाज अहमद मुश्ताक अहमद (१३) मोहम्मद हनिफ अय्युब, निसार अहमद जाफर, मोहम्मद इब्राहीम मोहम्मद अय्युब जखमी झाले या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी पोलीस ताफ्यासह घटना स्थळी धाव घेतली.मारहाण करणाऱ्यांपैकी दोन जणांना महिलांनी पकडुन ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही बातमी शहरात कळताच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी वऱ्हाडी मंडळींनी सुमारे दिड तास रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रत्नाकर नवले यांनी वऱ्हाडी मंडळींची समजुत काढत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी ५ व्यक्तींना ताब्यात घेतले आसून चौकशी सुरू आहे.