नाशिक - मुंबई, पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे मालिका आणि वेब सिरीजसाठी नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणाला पहिली पसंती मिळत आहे. नाशकाच्या ग्रामीण भागात मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना मालिकांचे नवीन एपिसोड पाहायला मिळणार आहेत.
कोरोना काळातील चित्रीकरणाबद्दल सांगताना 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेची टीम कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. याला बॉलिवूड देखील अपवाद नाही. तसेच लॉकडाऊन काळात चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्याचा फटका निर्माते आणि कलाकारांना बसला. त्यामुळे मुंबईमध्ये शूटींग करणे जोखमीचे बनले आहे. त्यातच नाशिकला निसर्गाचे वरदान लाभले आहे. तसेच मुंबई, पुणे देखील जवळ आहे. त्यामुळे आता नाशकातील ग्रामीण भागात ठिकाणी चित्रिकरण सुरू झाले आहे.
'माझ्या नवऱ्याच्या बायको' मालिकेचे चित्रीकरण झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांचे चित्रिकरण नाशिकच्या वाडीवरे या भागातील एका रिसॉर्टमध्ये सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कलाकार तंतोतंत पालन करत आहेत. तसेच नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागातदेखील लवकरच वेब सिरीज आणि शहरातील मखमालाबाद भागात 'सुनंदरा मनामध्ये भरली' या मालिकेचे चित्रीकरण सुरू होणार आहे.
१३ जुलैपासून 'माझ्या नवऱ्याची बायको'चे नवे एपिसोड -
जवळपास तीन महिन्यानतंर शूटिंग सुरू झालंय याचा आनंद आहे. नाशिकचं वातावरण थंड, निर्सगरम्य असल्याने निर्मात्यांची नाशिकला शूटिंग करण्यास नेहमीच पसंती असते. कोरोनाच्या काळात तसं काम करणं खूप कठीण झालं आहे. मात्र, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, याचा आनंद वाटतोय. काम करताना आम्हाला जेवढी मजा येते तेवढे 13 जुलैपासून नवीन एपीसोड पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे, असं अभिनेता अभिजित खांडकेकर म्हणाला.
'माझ्या नवऱ्याच्या बायको' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात तीन महिन्यानतंर आम्ही सर्व कलाकार एकत्र आलो याचा आनंद आहे. पण आम्ही कोरोनाकाळात सर्व पद्धतीची काळजी घेतोय. सर्व वस्तू सॅनिटाईझ करून वापरतो. शूटिंगच्या ठिकाणी रोज आमचे तापमान आणि ऑक्सिजन तपासले जाते. अनेकदा आमचा मेकअप आम्ही स्वतः करतो. तसेच दररोज सकाळी काढा आणि गरम पाणी पितोय, असे अभिनेत्री अनिता दाते हिने सांगितले.
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता अभिजित खांडकेकर आणि रसिका सुनिल मला सिरीयलमध्ये दोन वर्षांनी परत आल्याचा आनंद आहे. पहिल्या सारखीच आम्ही एकत्र येऊन मजेत काम करत आहे. स्वतः ची काळजी घेत चागंल्याप्रकारे काम करत असल्याचे अभिनेत्री रसिका सुनील हिने सांगितले.