महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाजार समिती बंद ठेण्याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार - छगन भुजबळ

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

chhagan bhujbal
बाजार समिती बंद ठेण्याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार - छगन भुजबळ

By

Published : May 7, 2021, 10:39 PM IST

नाशिक -कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागातील प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढवणार -

रुग्णसंख्या कमी होण्याची परिस्थिती दिलासादायक असली तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर कडक निर्बंध लावण्याबाबत नियोजन करण्यात येवून प्रतिबंधात्मक क्षेत्र वाढविण्यात यावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लसीकरण मोहिमेत कुणी वंचित राहणार नाही -

जिल्ह्यात बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत असून रेमडेसिवीरचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळण्यात यावा. ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयात आवश्यक ते मुनष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेत कुणी वंचित राहणार नाही, यासाठी लसीकरणाबाबत योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोविड केअर सेंटर अधिक सक्षम करण्यावर भर -

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोविड केअर सेंटर अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. जेणे करून रुग्णांना त्वरीत व वेळेत उपचार मिळणे शक्य होईल. तसेच सर्व कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन वापराबाबतचे ऑडिट पूर्ण करण्यात आले असून रेमडेसिवीरचा पुरवठा सर्व रुग्णालयांना सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - लता मंगेशकर यांनी केले वांद्रे जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details