नाशिक -सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सद्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले.
18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट -
नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असून रोज 6 हजाराच्या पटीत नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधील बेड फुल झाली असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्योगांना लागणारा 100 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कामासाठी वळवून सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. आज नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन सद्या उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास 18 मॅट्रिक टन ऑक्सिजनची तूट निर्माण झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दुप्पटीने ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अतिरीक्त वापर -