नाशिक :आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. नाशिकला आयोजित ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमृता फडणवीस सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
Amruta Fadnavis : आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व, पण... - अमृता फडणवीस - devendra fadnavis wife amrita fadnavis
आम्ही ब्राह्मण आहोत, आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. असे वक्तव्य अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या.
बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व -दरम्यान त्या अखिल भारतीय बहुभाषिय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे.आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमची ती महानता तशीच दिसून येते.
म्हणून न मागता उपमुख्यमंत्री पद दिले -देवेंद्र फडणवीस यांना न मागता मुख्यमंत्री पद दिलं होतं, असे अमृता फडणवीस म्हणाले. त्यांनी कधीच हे पद मागितलं नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं, असे अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.