महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धरण उशाला कोरड घशाला; मूलबक पाणी साठा असतानाही मनमाडकर तहानलेलेच - manmad water supply

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी अतिवृष्टी तर यंदा सुरुवातीलाच झालेला दमदार पाऊस यामुळे धरणात सुमारे 75 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, असे असताना देखील मनमाडकरांना 15 दिवसाआड पाणी मिळत आहे. महिन्यातून दोनदाच पाणी मिळत असल्याने मनमाडकर संताप व्य़क्त करत आहे.

water-shortage-in-manmad
धरण उशाला कोरड घशाला

By

Published : Jul 16, 2020, 12:00 PM IST

मनमाड (नाशिक)- मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. तरीही देखील ऐन पावसाळ्यात मनमाडकर तहानलेलेच आहेत. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मनमाडच्या सव्वालाख नागरिकांना सध्या महिन्यातून फक्त 2 वेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे आधीच कित्येक वर्ष
पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरत आहे. त्यातच दहा दिवस होऊन गेले तरी पालिकेला मुख्याधिकारी मिळत नसल्याने पालिकेचा कारभार रामभरोसेच दिसून येत आहे.

मनमाड शहरातील पाणी टंचाई संपता संपेना.! असेच काहीसे म्हणण्याची वेळ शहरातील जनतेवर येऊन ठेपली आहे. कारण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी अतिवृष्टी तर यंदा सुरुवातीलाच झालेला दमदार पाऊस यामुळे धरण सुमारे 75 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, असे असताना देखील मनमाडकरांना 15 दिवसाआड पाणी मिळत आहे. महिन्यातून दोनदाच पाणी मिळत असल्याने मनमाडकरामधून संताप व्य़क्त करण्यात येत आहे.

मनमाडकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर असुन गेल्या चाळीस वर्षांपासून यासाठी नागरिक लढा देत आहेत. मात्र शहरातील तसेच तालुक्यातील राजकीय पुढारी याचा फक्त राजकारण म्हणून वापर करून घेत आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत. जवळपास एक लाख पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या शहराला महिन्यात दोनदा तर कधी एकदाच पाणी पुरवठा होत आहे. पाणी नसल्यावर तर दुष्काळच मात्र पाणी असूनसुद्धा दुष्काळ सहन करण्याची वेळ शहरातील जनतेवर येऊन ठेपली आहे.

सध्या लॉक डाऊन तसेच बऱ्याच ठिकाणी काम बंद आहेत. त्यामुळे नागरिक जास्तीतजास्त घरी असतात, त्यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र पालिकेच्या ढिसाळपणामुळे शहराला पाणी पुरवठा होत नाही.

शहरात असलेले सत्ताधारी व विरोधक दोघेही बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. तर तालुक्यातील आजी-माजी आमदार या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरातील काही सजग नागरिक या बाबत आवाज उठवतात, परंतु जे बोलतात त्यांना मूर्ख समजून दुर्लक्षित करण्यात येत आहे. यावर काहीतरी कायमचा उपाय करून शहराला रोजच्या रोज मूलबक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details