महाराष्ट्र

maharashtra

अतिवृष्टीमुळे नस्तनपूरचा शनी मंदिर परिसर पाण्याखाली...

By

Published : Jul 5, 2020, 7:06 AM IST

श्री क्षेत्र नस्तनपूर हे राज्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भक्तांची नियमित वर्दळ असते. तालुक्यात सध्या गेल्या आठ दिवसापासून जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर पाण्याणे वेढला गेला आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा मंदिर पाण्यात गेले आहे.

shani temple after heavy rain l
अतिवृष्टीमुळे नस्तनपूरचे शनी मंदिर परिसर पाण्याखाली...

नांदगाव-(नाशिक) - तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील नस्तनपूर येथील प्रसिद्ध शनी महाराजांचे मंदिर दोनदा पाण्याखाली गेले आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी नाही. मात्र शनिमहारांजांची नित्योपचार सुरू आहेत. तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

श्री क्षेत्र नस्तनपूर हे राज्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भक्तांची नियमित वर्दळ असते. तालुक्यात सध्या गेल्या आठ दिवसापासून जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे मंदिराचा परिसर पाण्याणे वेढला गेला आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा मंदिर पाण्यात गेले आहे.

या मंदिराची देखील आख्यायिका असुन प्रभू श्रीराम यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केलेली शनिमहाराजांची मूर्ती असल्याचे सांगितले जात असल्याने या मंदिरास विशेष महत्व प्राप्त आहे. दर महिन्याच्या अमावस्येला येथे मोठ्या स्वरुपात यात्रा भरते. तसेच गुरुपौर्णिमा शनी जयंती यासह दिवाळी दसरा या सणांना देखील मोठया यात्रा भरतात. मात्र, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यातच आता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसर पाण्याखाली गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details