नाशिक- जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर 12 धरणात 10 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असून सर्व धरणे मिळून केवळ 9 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणांत केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नाशिकमधील 10 धरणे कोरडी ठाक, गंगापूर धरणात केवळ 24 टक्के पाणीसाठा महाराष्ट्रात धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, असे असतानासुद्धा यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. हजारो वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात लहान-मोठी 24 धरणे आहेत. यामध्ये सध्या 10 धरणे कोरडी ठाक पडली आहेत. 6 धरणामध्ये 5 टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 24 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस झाला नाही, तर नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार शहराला 15 जुलै पर्यँत पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पाणी जपून वावरावे, असे आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असणारी धरणे -
काश्यपी धरण, गौतमी गोदावरी, वाघाड धरण, ओझरखेड धरण, मुकणे धरण आणि तिसगाव धरणात 5 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
- शुन्य टक्के पाणीसाठा असणारी नाशिकमधील धरणे -
आळंदी धरण, पुणेगाव धरण, भावली धरण, वालदेवी धरण, कडवा धरण, भोजापूर धरण, हरणबारी धरण, केळझर धरण, नागासक्या धरण, माणिकपुंज धरणं.