महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Water Crisis : नाशिकमध्ये पाणी टंचाई; महिलांना खोल विहिरीत उतरून भरावं लागतंय पाणी - जलजीवन योजनेचा गाजावाजा

उन्हाळा सुरू झाला की, पाण्याची समस्या समोर येते. नाशिकच्या ग्रामीण भागातील पाण्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरीत तालुक्यात काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिला विहिरीत उतरून आपला जीव धोक्यात घालत आहेत.

water Issue
हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By

Published : May 15, 2023, 9:55 PM IST

हंडाभर पाण्यासाठी कसरत करताना महिला

नाशिक :नावालाच नाशिक हा धरणांचा जिल्हा आहे. येथे हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते. इगतपुरीत पाण्याची टंचाई आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील महिलांना दरवर्षी येतो. पाण्यासाठी डोंगरदऱ्या कड्या-कपाऱ्यांवर अक्षरशः पाण्याचा शोध घ्यावा लागतो. तसेच अनेक महिला तर दूरवरील विहिरीपर्यंत जायी जाऊन नंतर त्या विहिरीत उतरून पाणी काढताना दिसून आल्या आहेत.

पाण्यासाठी कसरत:इगतपुरी तालुक्यातील अंगावर काटा आणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पाणीटंचाईने किती तळ गाठला आहे. हे भीषण वास्तव या व्हिडीओने समोर आणले आहे. उन्हाळा सुरू होताच इथल्या गावांमध्ये पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या बायका दिसतात. हंडाभर पाण्यासाठी त्यांच जीवावर उधार होण अंगावर येत आहे. पाण्याने विहिरीचा तळ गाठलाय तशा महिलाही जीव मुठीत धरून विहीरीच्या तळाला गेले आहेत. तांब्याने घोट-घोट पाणी हंड्यात भरून तो हंडा वर ओढायचा ही कसरत डोळ्यात पाणी आणणारी आहे. आजची तहान भागवण्याची ही फरफट संपली तरी उद्याच काय हा प्रश्न आहे. पण विहिरीत उतरताना पाय घसरला तर काय, हा प्रश्न कोण सोडवणार?

सरकारचे डोळे केव्हा उघडणार: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 16 धरणे आहेत. महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातही दुर्दैवी म्हणजे सरकारच्या जलजीवन योजनेचा गाजावाजा असताना हे पाणीसंकट कोसळले आहे. इगतपुरी तालुक्यातील ही तांड्यांवर राहणारी माणसे कीती दिवस या योजनेपासून वंचित राहणार? आजचा हा जीव मुठीत धरून चाललेला पाणीखेळ उद्या जीवावर बेतल्यावर सरकार यांच्याकडे पाहणार काय? जे दिसतय ते इतके भयान वास्तव असताना सरकार कशाची वाट पाहत आहे. उद्या यात काही दुर्दैवी घडू नये ही काळजी असेल तर सरकारने लवकर डोळे उघडावेत अशी मागणी करत आहेत.

पाण्यासाठी पायपीट :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी शासनाने 15 लाख रुपये खर्च करून विहीर बांधली. मात्र या विहिरीला देखील गढूळ पाणी येत असल्याने हे पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट आदिवासी महिलांना करावी लागत आहे. निवडणुकीपुरते लोकप्रतिनिधी आश्वासन देतात, मात्र पुढील पाच वर्ष ते या गावांकडे फिरकत देखील नाही, असे ग्रामस्थ सांगतात.

नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी :ग्रामिण भागात नागरिकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नळ पाणी पुरवठा विहिरी, साधी विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अशा योजना राबविल्या जात आहे. या योजना आमच्या गावात राबवावा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नळाची मागणी होत आहे.

धरण उशाला आणि कोरड घशाला :नाशिक शहरातील मातीचे धरण असा नावलौकिक असलेल्या गंगापूर धरणाला गरज भासल्यास जवळच असलेल्या कश्यपी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची तहान जरी कश्यपी भागवत असली, तरी धरणाजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्या वस्तींवरच्या नागरिकांना मात्र पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे. गंगापूर धरणातून नाशिक शहरवासीयांची तहान भागवली जाते. गंगापूर धरणाची तहान कश्यपी भागवते, मात्र याच परिसरात रहिवाशांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी, लागते ही शोकांतिका आहे.

हेही वाचा -

  1. Illegal Camels In Nashik परवानगी नसताना राजस्थानमधून 111 उंट नाशिकपर्यंत आले कसे
  2. Sri Siddhivinayak Nashik उन्हाचा त्रास होवू नये म्हणून नाशिकमध्ये गणरायाला इतक्या किलोंची चंदनाची उटी आणि मोगऱ्याची आरास
  3. Nashik Water Problem धरण उशाला आणि कोरड घशाला या भागातील पाड्यावरील महिलांची पाण्यासाठी पायपीट

ABOUT THE AUTHOR

...view details