दिंडोरी (नाशिक) -नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू घेवून येणारे दोन कंटनेर वणी पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दोन कंटेनर गुटखा अन् सुगंधीत तंबाखू जप्त, चौघांना अटक - nashik police news
नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू घेवून येणारे दोन कंटनेर वणी पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक-सापुतारा महामार्गावरुन गुटखा वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी या मार्गावर सापळा लावत करंजखेड फाटा परिसरात दोन कंटनेर (आर.जे.30 जी ए 3914 व आर. जे. 30 जी ए 3824) मिळून आले. त्या कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 1 कोटी 24 लाख 34 हजार 730 रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधीत तंबाखून मिळून आली. पोलिसांनी गुटखा, तंबाखून व दोन्ही कंटेनर, असा एकूण 1 कोटी 64 लाख 34 हजार 730 रुपये किंमती मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महेंद्रसिंग शंबुसिंहानी सोलंकी (वय 38, रा. उदयपुर, राजस्थान), शामसिंग चतुरसिंहजी राव (वय 44, रा. बिंदसर, चितोडगड, राजस्थान), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (वय 56, रा. चितोडगड, राजस्थान) व लोगलजी मेहवाल (वय 48, रा. उदयपूर, राजस्थान) या चौघांना अटक केली आहे.