नाशिक- नाशिक शहरापाठोपाठ आता दिंडोरी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी वणी येथील व्यापारी व ग्रामस्थांनी तीन दिवस सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिंडोरीत कोरोनाचे थैमान, वणीतील बाजारपेठ राहणार तीन दिवस बंद - corona lockdown in dindori
दिंडोरी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी वणी येथील व्यापारी व ग्रामस्थांनी तीन दिवस सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन दिवसांच्या काळात फक्त रुग्णालय आणि औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत.
वणीतील बाजारपेठ राहणार तीन दिवस बंद
या तीन दिवसांच्या काळात फक्त रुग्णालय आणि औषधांची दुकाने सुरु राहणार आहेत. वणी येथील मार्केट हे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे मार्केट असून येथे दिवसाला करोडो रुपायांची उलाढाल होते. मात्र, या संकटाच्या काळात कापड दुकानापासून ते किराणा दुकानापर्यत सर्वच घाऊक व्यापाऱ्यांनी एक मताने तीन दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला. वणी येथील कापड व्यापारी प्रमोद भांबेरे यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना याबद्दलची माहिती दिली.
Last Updated : May 12, 2020, 7:42 PM IST