महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखण्याचे डॉक्टरांचे आवाहन - दिंडोरी नाशिक न्युज

दिंडोरी तालुक्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णामध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय वणी येथे रुग्णांची गर्दी वाढलेली दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

viral infection patient dindori nashik
डॉ. किशोर मोरे

By

Published : Feb 6, 2020, 10:11 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासून औषध उपचार सुरू आहेत. मात्र, आपआपल्या परिसरात डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी औषध फवारणी करून घेवून जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. किशोर मोरे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखण्याचे डॉक्टरांचे आवाहन

केरळसह महाराष्ट्रातही कोरोन विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले होते. यामध्ये केरळमधील ३ रुग्णांना या विषाणूची लागण झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच सर्दी, खोकला, ताप असल्यास नागरिक ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडून माहितीपत्रक वाटप करून जनजागृती करणार असल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

लक्षणे -
ताप, सर्दी, खोकला किंवा सर्दीमुळे घसा खवखवणे, अशी लक्षणे दिसताच त्वरीत ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घेणे

घ्यावयाची काळजी -

  1. पशू, पक्षी आणि प्राणी असेल त्या परिसरात स्वच्छता राखणे
  2. कोणत्याही रुग्णाला भेटल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे

ABOUT THE AUTHOR

...view details