महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

मालेगाव शहरातील बाजारपेठत रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची या ठिकाणी सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. तसेच शासकीय यंत्रणा मात्र या गर्दीकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना कोरोना उद्रेक होणार नाही का? की मालेगावकरांना कोरोनाची भीतीच उरली नाही

malegaon news
मालेगावकरांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन

By

Published : May 10, 2021, 9:31 AM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना मालेगावात मात्र सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, मालेगावात प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. येथील बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने फुलुन गेल्या असून प्रशासनाकडूनही याकडे डोळेझाक केली जात असल्याचे बोलले जात आहे.

मालेगावकरांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन

नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून लोकसंख्येच्या तुलनेत देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण नाशिकमध्ये असल्याचे समोर आहे. यामुळे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, मालेगावात या नियमांना नागरिकांकडून हरताळ फसली जात आहे. शहरातील बाजारपेठत रात्री उशिरापर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची या ठिकाणी सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. तसेच शासकीय यंत्रणा मात्र या गर्दीकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना कोरोना उद्रेक होणार नाही का? की मालेगावकरांना कोरोनाची भीतीच उरली नाही, असा सवाल काही सजग नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

90 टक्के नागरिक विना मास्क-

कोरोनापासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क, हात स्वच्छ ठेवणे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यभरात लॉकडाऊन असतानाही, मालेगावात सर्व नियमांना धाब्यावर बसवण्यात आले आहे. मालेगावात लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जवळपास 90 टक्के नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच बाजारपेठेत सोशल डिस्टनसिंग नावाला देखील दिसून येत नाही.


रमजान निमित्त बाजारपेठेत मोठी वर्दळ-

नाशिक शहरा पाठोपाठ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात सद्य स्थितीत 1 हजार 605 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र असे असतानादेखील रमजान निमित्त मालेगाव शहरातील मोहमद अली रोडवर नागरिकांकडून सर्रास कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. येथील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात आणि खरेदी करण्यासाठी नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

लसीकरणासाठी सुद्धा उदासीनता-

नाशिक शहरासह इतर तालुक्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत आहे. दुसरीकडे मालेगावात मात्र काही विभागात लसीकरणाबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसून येत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. मालेगावात लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details