नाशिक - वीज चोरी पकडायला गेलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास वडील आणि दोन मुलांनी लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना मालेगावात आज दुपारी घडली. पवारवाडी शिवारात सर्वे नंबर १९५/२/३ हलवाई मस्जिद जवळील पावरलूम कारखान्यात वीज चोरी होत असल्याचे माहिती सूत्रांकडून कार्यकारी अभियंत्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शेषराव टेकाळे व त्यांची टीम पावरलूम कारखान्यात गेले असता त्यांना वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.
विज चोरी पकडायला गेलेल्या अधिकारी अभियंत्यास बाप आणि दोघे मुलांकडून लोखंडी सळईने मारहाण - नाशिक
वीज चोरीची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणाचा पंचनामा चालू असताना जाफर अली व मुस्ताक अली या दोन भावासह त्यांच्या वडिलांनी अभियंता टेकाळे व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
मारहाण करण्यात आलेले अभियंता अधिकारी
वीज चोरीची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणाचा पंचनामा चालू असताना जाफर अली व मुस्ताक अली या दोन भावासह त्यांच्या वडिलांनी अभियंता टेकाळे व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान जखमी टेकाळे यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून या घटनेचा मालेगाव वीज कर्मचारी संघातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.