महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गिरणा नदीपात्रात विहीर खोदून पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध - नदीपात्र

मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पाण्यावरून संघर्ष उभा राहू लागला आहे. दरम्यान, पाटणे, आघार, चिंचवड, शिवारातील गिरणा नदीपात्रात विहीर खोदून बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांचा विरोध

By

Published : May 5, 2019, 3:28 PM IST

नाशिक - मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पाण्यावरून संघर्ष उभा राहू लागला आहे. दरम्यान, पाटणे, आघार, चिंचवड, शिवारातील गिरणा नदीपात्रात विहीर खोदून बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांचा विरोध

याबाबत तहसीलदार चंद्रसिंग राजपूत यांची भेट घेऊन संतप्त शेतकऱ्यांनी जलवाहिनी कामास कुठल्याही शेतकऱ्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी करीत निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदारांनी टंचाई काळात जलवाहिनी कामास परवानगी दिली जाणार नसल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

मालेगाव तालुक्यातील पाटणे आघार, चिंचवड, शिवारातील गिरणा नदीपात्रात आणि नदीकाठावर बाहेरगावच्या शेतकऱ्यांनी जमिनी घेऊन विहीर खोदकाम सुरू केले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या विहिरीचे काम शासकीय मंजुरीने झाले असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाईपलाईनचे काम करून पाणी उपसा केला जात आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला १०० ते १५० विहिरी असून दत्त के. टी. वेअर बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो.
तर विहिरी व जलवाहिनीसाठी मोठा आर्थिक खर्च झाला असून विहिरीतून पाणी मिळावे, यासाठी जलवाहिनी टाकून द्यावी, अशी मागणी मुंगसे ग्रामस्थांनी केली आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार इंद्रजीत राजपूत यांची भेट घेतली असून आपले म्हणणे मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details