महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik News : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी चक्क गाव विकायला काढले - देवळा तालुक्यातील माळवाडी

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्यासह इतर शेतीमालांना भाव मिळत नसल्याने आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क एक गाव विक्रीसाठी काढण्यात आले आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. या गावाने सरकारला हे गाव विकत घेण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याने सध्या या गावाची राज्यभर चर्चा सुरू आहे.

Nashik News
Nashik News

By

Published : Apr 14, 2023, 7:22 PM IST

उदरनिर्वाह करण्यासाठी चक्क एक गाव निघाले विक्री

नाशिक :गाव विकायला काढला आहे असे म्हटलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरं आहे, नाशिकच्या देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामस्थांनी चक्क गावच विकायला काढले आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्यासह इतर शेतीमालांना भाव मिळत नसल्याने आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सरकारने हे गाव विकत घ्यावे असा ठराव करत सरकारला पाठवला आहे. सरकारने गाव विकत घेऊन मोबदला देण्याचा ग्रामस्थांचा ठराव केला आहे.



गाव विक्रीचा ठराव : नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील माळवाडी गाव. पाच हजार लोकसंख्येच्या या गावात तब्बल 534 हेक्टर शेतजमीन असून ही सगळी शेतजमीन, गाव, गावकऱ्यांनी विक्रीला काढल आहे. या गावातील 95 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. मात्र, सततचे आसमानी संकट, शेतीमालाच्या भावातील घसरण, यात सरकारची फसवी मदत यामुळे गावातील शेतकरी पुरता बेजार झाला आहे. म्हणून आता आत्महत्या न करता गाव विक्री करण्याचा निर्णय या गावाने घेतला आहे. गावात अनऔपचारिक ग्रामसभा घेत या सभेत या ग्रामस्थांनी हे गाव विक्री काढण्याचा ठराव पारित केला आहे.



सरकारी मदत मिळत नाही : सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देत नाही. आस्मानी संकटात केलेली मदत शेतकऱ्या पर्यंत पोहचत नाही. जेंव्हा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतो तेंव्हा सरकार हस्तक्षेप करून भाव कमी करते, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माळवाडीकरांनी गावच्या सभामंडपात एकत्र येत गाव विक्रीचा ठराव करून तो सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील ग्रामस्थांनी गाव विक्री करण्याचा घेतलेल्या या निर्णयाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.



दैनंदिन गरजा पूर्ण होत नाहीत : देवळा तालुक्यातील शेतकरी कांदा या प्रमुख पिकावर आपला उदरनिर्वाह करतात. माळवाडी गावात शेतीवर आधारित असलेली कुटुंब आहेत. शिक्षण, आरोग्य, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेतकऱ्यांना शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही,अशी स्थिती आहे. दैनंदिन गरजा, खासगी सरकारी बँकांची कर्ज फेडण्यासाठी गावच्या शेतकऱ्यांकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी संपूर्ण माळवाडी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - PM Modi Assam Visit: नवीन सुविधांमुळे आसामसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा बळकट होणार: पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details