येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील मातुलठाण येथिल कातुरे वस्तीवरील नागरिकांना नदीपार करण्याकरता जीवघेणी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी असल्याने दोरीच्या सहाय्याने नदी पार करण्याची वेळ तेथील कुटुंबांवर आली आहे.
वारंवार पूल बांधून देण्याची मागणी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. नदीला गेल्या चार दिवसापासून पूर आल्याने कोणत्या प्रकारचे वाहन घेऊन जाता येत नाही. परिणामी शेतमालाची विक्री करता येतही नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.
हेही वाचा -महात्मा गांधी जयंती 2021 : सोनिया गांधी, मोदी, केजरीवालांकडून गांधीजींना राज घाटावर आदरांजली अर्पण