नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाली विक्रीसाठी आणला. मात्र, व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवली आहे. भाजीपाल्याची किरकोळ विक्री होत आहे. त्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कोरोनाने भाजीपाल्याचे भाव गडगडले... हेही वाचा-''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये भाजीपाल्याचा समावेश होता. मात्र, व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किरकोळ भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. दोन दिवसांपूर्वी विकला जाणारा भाजीपाला आज 50 टक्के पेक्षा कमी भावाने विकला जात आहे. मात्र, नागरिक संचारबंदी असतानाही बाजारात गर्दी करत आहेत.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी 519 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूमुळे देशातील करोनाबाधित बळींची संख्या 10 वर गेली. देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, टाळेबंदी झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्यास संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. अखेर केंद्राने 21 दिवसांची देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली.