महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 1, 2020, 7:26 PM IST

ETV Bharat / state

नाशिकमध्ये स्कूल व्हॅनला अपघात; 10 विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्यांना घेवून जाणारी व्हॅन पलटी होऊन ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले. यातील ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

van-carrying-the-schoolchildren-had-an-accident
शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला अपघात

नाशिक - विद्यार्थ्यांना घेवून जाणारी व्हॅन पलटी होऊन ८ ते १० विद्यार्थी जखमी झाले आहे. यातील ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाता नंतर पंचनामा होण्याआधीच घटना स्थळावरून अपघात ग्रस्त व्हॅन उचलून लपवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात केवळ अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला अपघात

मनमाड पासून जवळ चांदवड रोडवर आज विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणारी व्हॅनला अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की व्हॅन तिन पलटी घेऊन रस्त्यालगत असलेल्या कांद्याच्या वखारीजवळ उलटली. अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून त्या पैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मालेगावच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व विध्यार्थी हे शहरा पासून जवळ असलेल्या कांचन सुधा इस्टिट्यूट या शाळेतील असून ते नर्सरीत शिकत आहे. व्हॅनचा अपघात झाल्याचे कळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.

अपघाता नंतर पोलीस येण्या अगोदर अपघातग्रस्त वाहन घटनास्थळा वरून पळवून नेऊन ते शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला असून अपघाताचा पंचनामा होने गरजेचे असतांना वाहन घटनास्थळा वरून हलविण्यात आल्यामुळे एका प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक व पालकांनी केला आहे. मुळात शाळेच्या अधिकृत आरटीओने पासिंग केलेल्या बसेस न वापरता मॅजिक व व्हॅन या गाड्यांचा वापर शालेय व्यवस्थापन समिती करत आहे. त्यातही एका गाडीची आसन व्यवस्था केवळ 10 जणांची असतांना एक व्हॅन मधून 25 जणांना दाबून भरून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे भरमसाठ फी वसुली करून सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.

या आधीही अनकदा पालाकांनी बस ड्रायव्हर हे भरधाव वाहन चालवतात अशा तक्राी करून देखील शालेय समितीच्या वतीने कुठलीही दखल घेण्यात आली नाही. आज काहीही कारण नसतांना हा अपघाता झाला असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या उलट शालेय प्रशासन कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. या कडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details